ऑनलाईन टीम / लंडन :
भारतातील बँकांचे कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती मद्य सम्राट विजय मल्ल्याला दिवाळखोर जाहीर करण्यास नकार देत ब्रिटनच्या हायकोर्टाने मल्ल्याला दिलासा दिला आहे.
मल्ल्याकडून कर्जाची वसुली करण्यासाठी मल्ल्याला दिवाळखोर जाहीर करण्यात यावे अशी मागणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली भारतीय सार्वजनिक बँकांनी याचिका दाखल केली होती.
त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती मायकल ब्रिग्स यांनी मल्ल्याशी संबधित भारतातील सर्वोच्च न्यायालयात आणि कर्नाटक न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत मल्ल्याला वेळ द्यायला हवा असे म्हणत सध्या तरी बँकांनी अशा प्रकारे कोणतीही कारवाई करण्याचे कारण नाही असे म्हटले आहे.
मल्ल्याच्या नावावर जगभरात ठिकठिकाणी मालमत्ता आहे. यात फ्रान्समधील एक व्हिला, ब्रिटनच्या व्हर्जिन बेटावर असलेली मालमत्ता, कॅरेबियन देशातील एक ट्रस्ट आदी मालमत्तांची यादी ब्रिटनच्या हायकोर्टात बँकांतर्फे सादर करण्यात आली आहे.