ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बँकांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज बुडबून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने नव वर्षाच्या सुरुवातीलाच माल्ल्याला दणका दिला आहे.
एसबीआयसह अनेक बँकांना विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने दिली आहे.
किंगफिशर एअरलाईन्सचा प्रमुख असलेल्या विजय माल्ल्यावर 9 हजार कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रींगचा आरोप आहे. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.
माल्याने कर्जाची मुद्दल देतो, व्याज नाही, असे म्हटले होते. मात्र, हा निर्णय बँकांना मान्य होणारा नव्हता. माल्ल्याची संपत्ती विकून बँकांनी त्यांची वसुली करण्यावर ईडीलाही आक्षेप नाही. कोर्टालाही ईडीने तसे पूर्वीच सांगितले होते. त्यामुळे कोर्टानेही माल्ल्याची संपत्ती जप्त करुन ती विकण्याची परवानगी बँकांना दिली आहे.