प्रतिनिधी /मोरजी
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज मांदे मतदार संघाचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार दीपक कलांगुटकर यांच्या सोबत रविवारी माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत, सुशांत घोडगे,पेडणे मतदार संघ गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार ?ड.जितेंद्र गावकर,तसेच अन्य कार्यकर्ते होते. पार्से येथील श्री देवी भगवतीला नारळ अर्पण करून गोवा फॉरवर्ड पक्षाने मांदे मतदार संघाचे उमेदवार दीपक कलंगूटकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ केल्यानंतर मतदार संघातील काही प्रमुख कार्यकर्ते तसेच राजकीय व्यक्तींच्या भेटी घेतल्या. त्याच वेळी त्यांनी हरमल येथे गणपतराव पार्सेकर महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीही भेट घेतली.या भेटी संदर्भात सांगताना श्री सरदेसाई यांनी ही आमची केवळ सदिच्छा भेट होती.