क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
विजय हजारे करंडक सीनियर क्रिकेट स्पर्धेत गोवा आपली मोहिम आज बडोदाविरूद्धच्या लढतीने करेल. सूरतमध्ये ही स्पर्धा होत असून गोव्याच्या गटात बडोदा, गुजरात, छत्तीसगड, त्रिपुरा आणि हैदराबाद हे संघ आहेत.
टी-20 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या गोव्याच्या चमूतून दोन बदल करण्यात आले आहेत. पूर्ण तंदुरूस्त नसलेल्या अमोघ देसाई याला वगळून किनन वाझ तर निवृत्ती स्वीकारलेल्या अशोक दिंडाच्या स्थानावर हर्षद गडेकरला स्थान देण्यात आले आहे. गोव्याचे कप्तानपद अमित वर्मा याच्याकडे परत एकदा सोपविण्यात आले आहे.
गेव्याचे सामने याप्रमाणे : विरूद्ध बडोदा (20 फेब्रुवारी), विरूद्ध गुजरात (22 फेब्रुवारी), विरूद्ध छत्तीसगड (24 फेब्रुवारी), विरूद्ध त्रिपुरा (26 फेब्रुवारी), विरूद्ध हैदराबाद (28 फेब्रुवारी).