वार्ताहर/ विजापूर
घरफोडय़ांच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने येथील सॅटेलाईट बसस्थानकात 21 रोजी चौघा चोरटय़ांना अटक करून त्यांच्याकडून 173 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किमत 7 लाख रुपये व 50 ग्रॅम चांदीच्या दागिने हस्तगत केले आहेत. रफीक मेहबूबसाब बेपारी, शाहीद इब्राहिम कमटगी, अश्पाक गोडय़ा सैपनसाब शेख, आरीफ नुरसाब अशी या चोरटय़ांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरात अनेक महिन्यापासून घरफोडय़ा होत आहेत, याचा तपास लावण्यासाठी जिल्हा वरि÷ पोलीस अधिकारी अनुप अगरवाल यानी एक डीएसपी व एसीपी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले होते. 21 रोजी सकाळी 6 वाजता चौघे संशयास्पदरित्या येथील गोदावरी हॉटेलजवळ नवीन बांधण्यात आलेल्या सॅटेलाईट बसस्थानकात घुटमळत होते. पोलिसांनी त्यांना हटकले व चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी संशय आल्याने गांधी चौक पोलीस ठाण्याला कळविले व गस्ती जिप तिथे पोहचली व त्यांनी त्या चौघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. चौकशी केली असता त्यांनी दोन चोऱया केल्याचे कबूल केले.
रफीक मेहबूबसाब बेपारी, शाहीद इब्राहिम कमटगी, अश्पाक गोडय़ा सैपनसाब शेख, आरीफ नुरसाब या चौघांनी ग्यान बावडीमध्ये एका घरात चोरी केल्याचे चौकशीदरम्यान निदर्शनास आले. त्या घरातून एकूण 173 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किमत 7 लाख रुपये व 50 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींच्या घरातून हा ऐवज ताब्यात घेण्यात आला. वरील आरोपी पैकी एक जण गवंडी, एकजण आमलेट गाडा तर एक जण चिकन दुकान चालवित होता. या घटनेची नोंद गांधी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्हा वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी या कामगिरीबद्दल तपास अधिकाऱयांना बक्षीस जाहीर केले आहे. आरोपांकडून अजूनही काही चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.