वार्ताहर/ विजापूर
घरात असलेल्या वृद्धाचा दिवसा-ढवळय़ा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना विजापूर शहरातील गोडबोळे माळा येथे सोमवारी घडली. विनय नायक (वय 68) असे मृताचे नाव आहे. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असता ही घटना घडली आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. चोरी करण्यास आलेल्या चोरटय़ांनी विनय यांचा खून केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनुपम अगरवाल आणि गांधी चौक पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची नोंद गांधी चौक पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.