विजापूर
जिल्हय़ाच्या बसवन बागेवाडी तालुक्मयात गुरुवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहेत. मनगुळी, उकली या गावांमध्ये जमिनीतून विचित्र आवाज येत होता. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक घरातून रस्त्यावर आले. काही घरांच्या भिंतींना तडा गेला आहे. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली होती. त्यामुळे लोक घरात जाण्यासाठी घाबरत आहेत. यापूर्वीही तालुक्मयातील कोलार गावात गेल्या सहा महिन्यापासून असे आवाज येत होते. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱयांनी बेंगळूरहून काही तज्ञांना पाचारण करून पाहणी केली. शुक्रवारी सकाळी तहसीलदारांच्या नेतृत्त्वाखाली सदर पाहणी करण्यात आली.