नवी दिल्ली
विजेच्या वापरात जूनमध्ये पहिल्या आठवडय़ात 12.6 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राकडून मागणीत वाढ झाल्याने पहिल्या आठवडय़ात 25.36 अब्ज युनिट विजेचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऊर्जा मंत्रालयाने सदरची माहिती नुकतीच दिली आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये विजेचा वापर अगदी 11 टक्क्यांनी कमी राहिला होता. लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला होता.