प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा धोका ओळखून हेस्कॉमने मागील महिन्यांची सरासरी काढत एप्रिल महिन्यात विजेचे बिल दिले होते. लॉकडाऊन असल्यामुळे काही ग्राहकांना ते भरणे शक्मय झाले नसल्याने या महिन्यात दोन महिन्यांचे एकत्रित बिल देण्यात येत आहे. ग्राहकांनी हे वीज बिल भरावे, असे आवाहन हेस्कॉमकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बिल भरण्यासाठी कोणत्याही ग्राहकांना तगादा लावू नये, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार हेस्कॉमने एप्रिल महिन्यात कोणत्याही ग्राहकाला तगादा अथवा जोडणी तोडणे असे केले नव्हते. आता सरकारने लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल केल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना बिल भरणा केंद्रावर येऊन बिल भरता येऊ शकते. मागील महिन्यात काही ग्राहकांनी ऑनलाईन तसेच मोबाईल वॉलेटद्वारे विजेचे बिल भरले होते. परंतु ज्या ग्राहकांनी बिल भरले नव्हते त्यांना दोन महिन्यांचे एकत्रित बिल या महिन्यात दिले जात आहे. ग्राहकांनी ऑनलाईन, पेटीएम, फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे या बरोबरच हेस्कॉमच्या ग्राहक सेवा केंद्रांवर बिल भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.