प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे नागरिक विठ्ठलदास यशवंत पै काकोडे यांचे आज अल्प आजाराने दुःखद निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. दुपारी त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते वै. विलासीनी उर्फ उज्वला यांचे पती, विशाल / स्मिता, गौतम / योगिता, यशवंत उर्फ अमर / अपर्णा तसेच लक्ष्मी व शिवदत्त शेटय़े यांचे वडिल / सासरे होत. ते सोनल प्रभव नायक, वैष्णवी, नेहल, साईनील, मांगिरीश, संकल्प, अभिर व अवनी यांचे आजोबा होते.
विठ्ठलदास यांचा जन्म कुंकळ्ळी येथे झाला. सन 1968 मध्ये ते मडगावात स्थायिक झाले. मेसर्स केशव शेणवी कुंदे व कंपनीचे ते भागधारक होते. म्हार्दोळ-फोंडा येथील श्री महालसा संस्थानचे ते माजी अध्यक्ष होते. मडगावच्या रोटरी क्लबचे सदस्य तसेच मडगाव क्रिकेट क्लबचे ते संस्थापक सदस्य होते.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस, मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक, पत्रकार संदेश प्रभुदेसाई तसेच इतरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विठ्ठलदास पै काकोडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.