वार्ताहर /पर्ये
विठ्ठलापूर सांखळी येथील श्री देव विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटी,श्री देव पंचायतन भक्तमंडळ यांच्या सहयोगाने गुरुवार दि.24 ते शनिवार दि.26 असे तीन दिवस विष्णुयाग अनुष्ठानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 8 वाजता प्रायश्चित्त विधी, देहशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन ,नांदी श्राद्ध, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, श्री देवी भगवती मंदिरात देवी भागवतीस महाभिषेक, कुंकुमार्चन, देवता स्थापना, हवनद्वारा नवचंडी, त्यानंतर महाआरती व सामूहिक गाऱहाणे व तीर्थप्रसाद होणार आहे.ज्या महिलांना अखंड सौभाग्यासाठी स्वहस्ते देवी भगवतीस कुंकुमार्चन करायचे आहे त्यांनी त्यादिवशी सकाळी 10 पर्यंत मंदिरात उपस्थित राहावे. संध्या.6 वाजता महादेव खुटेश्वर भजनी मंडळ पर्ये सत्तरी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी देव विठ्ठल मंदिरात पुण्याहवाचन, पंचसूक्तांद्वारे श्रींवर महाअभिषेक, पवमान जप व इतर धार्मिक विधी होणार आहेत. श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र, दुपारी महाआरती, संध्याकाळी धुपारती व मंत्रपुष्प, संध्या.5 वाजता मंत्रजागर, संध्या. 6 वाजता महादेव खुटेश्वर भजनी मंडळ पर्ये सत्तरी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि.26 रोजी सकाळी श्री देव विठ्ठल मंदिरात पंचसूक्तांद्वारे श्रींवर महाअभिषेक, पवमान जप आवृत्ती, पवमान स्वाहाकार, दुपारी 1 वाजता पूर्णाहुती, महाआरती, सामूहिक गाऱहाणे व तीर्थप्रसाद, संध्या. 6.30 वाजता आजगावकर दशावतारी नाटय़मंडळ आजगाव यांचा ’पंचारती महिमा’ हा दशावतारी नाटय़प्रयोग सादर होणार आहे. रात्री 10.30 वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक, आरती व कार्यक्रमाची सांगता होईल, असे विठ्ठलापूर सांखळी येथील श्री देव विठ्ठल पंचायतन संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9422388873, 9970054849 किंवा 9422575055 या क्रमांकावर संपर्क साधावा.