प्रतिनिधी/.बेळगाव :
संकटात सापडलेल्या गरीब विणकर बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. उद्यमबाग येथील रिलायन्स इंजिनियरिंग कार्पोरेशनचे मालक मधू हाशिलकर यांच्यावतीने वडगाव, खासबाग आणि परिसरातील गोर गरीब विणकरांना तसेच श्री नामदेव शिंपी समाजातील गरजुंना मोफत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप सुरू आहे. आई रूक्मिणी आणि वडिल रूक्माण्णा हाशिलकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. बुधवारी चावडीगल्ली वडगाव येथील श्री मल्लीकार्जुन देवस्थानात या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. एकूण 550 गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तु देण्यात येणार आहे. पुढील तीन चार दिवसात सर्व कुटुंबियांना याचे वाटप होणार असल्याचे यावेळी अमर हाशिलकर यांनी यावेळी सांगितले.
बुधवारी अमर मधु हाशिलकर यांच्याहस्ते शंभरहून अधिक विणकर कुटुंबियांना या वस्तुंचे वाटप करण्यात आले. कुरूहीनशेट्टी, देवांग, स्वकुळसाळी समाजातील विणकर बांधव आणि श्री नामदेव शिंपी समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप हाशिलकर यांच्यावतीने करण्यात येत आहे. याप्रसंगी सामाजिक अंतर राखण्याबरोबर आवश्यक नियमांचे पालन करण्यात येत आहे. याप्रसंगी यांच्यासह वडगाव येथील कुरूहीन शेट्टी समाजाचे अध्यक्ष अत्तीमरद, श्रीधर तिगडी, इरप्पा तिगडी, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर, सह सचिव मोहन कोपर्डे यांच्यासह अन्य उपस्थित होते.