विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धा : आज रंगणार उपउपांत्यपूर्व सामने
वृत्तसंस्था/ जयपूर
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक, विदर्भ आणि मध्यप्रदेश या संघांचे रविवारी उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार असून या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत या वरील तीन संघांचे पारडे किंचित जड ठरु शकते.
फजलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाचा सामना त्रिपुराबरोबर होणार आहे. तसेच कर्नाटकाचा सामना बलाढय़ राजस्थान बरोबर होईल. हे दोन्ही सामने येथील सैनी स्टेडियमवर खेळविले जातील. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांच्यातील सामना चुरशीचा अपेक्षित आहे. राजस्थान आणि कर्नाटक यांच्यातील सामना चुरशीचा अपेक्षित आहे. कर्नाटक संघाची भिस्त प्रामुख्याने रवीकुमार समर्थ, रोहन कदम, मनीष पांडे, करूण नायर यांच्या कामगिरीवर राहील.
विदर्भ आणि त्रिपुरा यांच्यातील सामना रविवारी सकाळी 9 वाजता सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळविला जाईल. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांच्यातील सामन्यात वेंकटेश अय्यरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अय्यरची फलंदाजी बहरली असून त्याने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सामन्यात 349 धावा तर शुभम शर्माने 335 धावा जमविल्या आहेत.