प्रतिनिधी/ मडगाव
विदेशात असलेल्या गोवेकरांना प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार दामू नाईक यांनी ‘बेबे’ म्हटल्याने काल गुरूवारी काँग्रेस पक्षाने त्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. दक्षिण गोव्याचे जिल्हाध्यक्ष जोसेफ डायस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मडगावमधील भाजप कार्यालयसमोर निषेध केला.
गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आल्तिन गोम्स, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, मोरेनो रिबेलो. जोसेफ वाझ, जिल्हा सदस्य दीपक खरंगाटे, अ??ड येमेन डिसोझा, जॅरिस गोयस, एथेल लोबो, पीटर गोम्स, पराग राईकर, आर्क. रॉयला फर्नांडिस, फ्लोरियानो कुलासो, विल्सन गोन्साल्वीस, गटाध्यक्ष मॅन्युएल कुलासो, रायन व्हिएगस, गोपाळ नाईक, नॉरोन्हा आणि खलाशी रेमंड फर्नांडिस, मिशेल रिबेलो आणि इतरांनी विरोध दर्शविला.
परदेशात कार्यरत गोवेकर गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावत आहेत. भाजपचे वाहक दामू नाईक यांनी त्यांना ‘बेबे’ म्हणून संबोधलेल्या अपमानास्पद टीकेचा आपण तीव्र निषेध करतो. भाजपने त्वरित माफी मागितली पाहिजे अशी मागणी दक्षिण गोव्याचे जिल्हाध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली. जोसेफ डायस म्हणाले की, गोवेकरांना नोकऱया उपलब्ध करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
परदेशात काम करणारे गोवेकर नेहमीच आपल्या मातृभूमीशी संपर्क साधतात आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करतात. अशा प्रकारे आपल्या बांधवांचा अपमान करणे अत्यंत निंदनीय आहे असे रॉयला फर्नांडिस म्हणाल्या.
रोजी-रोटी मिळवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो आणि आमच्या कमावलेल्या पैशातून आम्ही गोव्यातील आमच्या कुटुंबियांना आधार देतो असे खलाशी रेमंड फर्नांडिस म्हणाले.
पोलिस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
काँग्रेसचे कार्यकर्ते जेव्हा भाजपच्या कार्यालयासमोर दामू नाईक यांची प्रतिमा घेऊन आले. तेव्हा, फातोर्डाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी त्यांना कार्यालयासमोर प्रतिमेचे दहन करण्यास आक्षेप घेतला. यावेळी निरीक्षक कपिल नायक व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. पोलीस भाजपचे कार्यकर्ते आहेत का ? असा सवालही उपस्थितीत करण्यात आला. मात्र, निरीक्षक कपिल नायक यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रतिमेचे दहन भाजप कार्यालयासमोर करण्यास ठाम वि्1022ारोध दर्शविला. रस्त्याच्या दुसऱया बाजूला किंवा अन्य कुठेही दहन करा असे श्री. नायक म्हणाले. शेवटी मडगाव कदंब बस स्थानकाजवळच्या फुटपाथवर दामू नाईक यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.