इस्लामाबाद
आर्थिक संकटाशी सामना करणारा पाकिस्तान परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. पाकिस्तानवर यावेळी सध्या असलेले परदेशी कर्ज 115 अरब डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. त्यातच गेल्या साधारण दोन वर्षापासून एफएटीएफच्या ग्रे यादीत पाकिस्तान कायम राहिला आहे. गुरुवारीच एफएटीएफने जाहीर केलेल्या निर्देशांनुसार पाकिस्तानची आणखीनच कोंडी झाली आहे. नव्या संकटांमुळे इम्रान खान यांच्या सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये विदेशी गुंतवणूक, आयात, निर्यात आणि ‘आयएमएफ’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेताना पाकिस्तानला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचमुळे पाकिस्तान ग्रे यादीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र दहशतवादाला पाठिंबा देणे हे त्यांच्या समस्यांचे कारण आहे.