सप्टेंबरच्या सद्य स्थितीपर्यंत 3,944 कोटी रुपयांची निक्वळ गुंतवणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी(एएफपीआय)ने चालू महिन्याच्या सद्य कालावधीपर्यंत भारतीय भांडवली बाजारात 3,944 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत देशातील शेअर बाजारात 1,766 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. याच दरम्यान त्यांनी डेट सेगमेंटमध्येही 2,178 कोटांची गुंतवणूक केल्याची नोंद आहे.
सप्टेंबरच्या अगोदर तीन महिन्यापासून एफपीआयने भारतामध्ये निव्वळ गुंतवणूक कायम राखली आहे. त्यांनी भारतीय भांडवली बाजारात ऑगस्टमध्ये 46,532 कोटी रुपये, जुलैमध्ये 3,301 कोटी रुपये आणि जून महिन्यात 24,053 कोटी रुपयांची निक्वळ गुंतवणूक केली आहे. यांच्याही अगोदर एफपीआयने मार्चमध्ये 1,18,203 कोटी रुपये, एप्रिलमध्ये 14,859 कोटी आणि मेमध्ये 7,356 कोटी रुपये काढल्याची माहिती आहे.
एफटीएसचे ग्लोबल इक्विटी इंडेक्स आशिया पॅसिफिक एक्स जपान आणि चीनमधील समभागांच्या बदल्याने विदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत राहिली आहे. तसेच सदरच्या निर्देशांकानुसार काही नवीन भारतीय समभाग जोडण्यात आले आहेत. अमेरिकेतील ब्रॉण्ड यील्ड घटल्याच्या कारणामुळे भारतीय डेटमध्येही विदेशी गुंतवणूक वधारली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विदेशातील भांडवल भारताकडे
जागतिक बाजारामधील भांडवल मोठय़ा प्रमाणात भारतीय बाजाराकडे येत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत असल्याचे मॉनिंगस्टार इंडियाचे असोसिएट संचालक रिसर्च हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.