जवळपास 9.46 अब्ज डॉलर्सची घसरण : दोन वर्षापूर्वीचा विक्रम मोडला
वृत्तसंस्था/ मुंबई
देशाच्या विदेशी चलन साठय़ामध्ये 9.46 अब्ज डॉलर्सची घसरण राहिली आहे. 11 मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ातील ही घट असून मागील दोन वर्षांनंतरची ही विक्रमी घट मानली जात आहे. या संदर्भातील आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) सादर करण्यात आली आहे.
अशी स्थिती होण्यास मोठय़ा प्रमाणात डॉलरची विक्री झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण येत राहिली होती. मार्चमध्ये 77.02 रुपयांपर्यंत डॉलर पोहचला होता. ही घसरण ऐतिहासिक पातळीवर राहिली आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेने बाजारात डॉलरची विक्री केली.
20 मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात 11.10 अब्ज डॉलर्सने चलन साठा कमी होत 554.35 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.
सर्वात मोठी घसरण
अलीकडे विदेशी चलन साठय़ामध्ये आलेली घसरण मागील दोन वर्षातील सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितले जाते. यामध्ये 3 सप्टेंबर 2021 रोजी 642.45 अब्जचा टप्पा प्राप्त केला होता. मात्र चलन साठय़ामध्ये सोन्याचे मूल्य मात्र वाढले आहे. कारण किमतीमधील तेजीचा परिणाम आहे.
आरबीआयकडून डॉलरची खरेदी
जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला होता, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डॉलरची खरेदी केली होती. कारण मागील वर्षात चलन साठा विक्रमी टप्प्यावर पोहोचला होता. कोणत्याही देशाच्या चलनाची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी आपत्कालीन कालावधीत विदेशी चलनाची विक्री करण्याचे काम केले जाते.