वार्ताहर / हरमल
हरमल येथे एक विदेशी पर्यटक पॉझिटिव्ह मिळाल्याने नागरिकांत भीती व्यक्त होत असून गावात सर्वत्र मास्कविना फिरणाऱया विदेशींना आवरण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयाने याबाबत सविस्तर सांगताना, शनिवारी 22 रोजी एक पर्यटक तुये इस्पितळात पायाच्या मलमपट्टीसाठी गेला होता. त्यावेळेस त्याने ताप येत असल्याचे डॉक्टरना सांगितले, लागलीच त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला.
पर्यटकांना होम क्वारंटाईन न करता त्याना इस्पितळात दाखल करून घेणे हिताचे असल्याची प्रतिक्रिया टोनी डिमेलो यांनी दिली. विदेशी पर्यटक किनारी भागांत फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भरत पेडणेकर यांनी केली आहे.
सध्या कित्येक विदेशींची परिस्थिती हलाखीची झाल्याने मास्क खरेदीसाठी पैसे नसून फक्त पाव व वडा खाऊन ते दिवस ढकलत असल्याचे चित्र आहे. त्यांचा मुक्त वावर स्थानिक लोकांच्या जीवावर बेतू शकतो अशी शक्मयता नागरिक व माजी पंच अनिल बर्डे यांनी व्यक्त केली. दरम्यान, त्या विदेशी पर्यटकाबाबत स्थानिक पंचांना कसलीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, असे पंच प्रवीण वायंगणकर यांनी सांगितले.