सलग दुसऱया दिवशी ईडीकडून 9 तास चौकशी, लेखी उत्तरांची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने सलग दुसऱया दिवशी 9 तास कसून चौकशी केली आहे. काँगेसचे मुखपत्र असणाऱया नॅशनल हेरॉल्डशी संबंधित 2 हजार कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेच्या अपहारासंबंधीचे हे प्रकरण आहे. काँगेसने दिलेले 90 कोटी रुपयांचे कर्ज आणि एजेएल या कंपनीचे समभाग यंग इंडियन्स या कंपनीकडे हस्तांतरीत होणे इत्यादी मुद्दय़ांचाही समावेश या दोन दिवसांमध्ये करण्यात आलेल्या चौकशीत होता.
मंगळवारच्या चौकशीत राहुल गांधी यांना 40 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. सोमवारच्या चौकशीत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे दिली नव्हती, अशी सूत्रांची माहिती आहे. याच मुद्दय़ांवर मंगळवारी त्यांची चौकशी पुन्हा करण्यात आली. मंगळवारची चौकशी राहुल गांधींची विदेशातील खाती आहेत काय या प्रश्नावर केंद्रीत होती.
मालमत्तांची चौकशी
विदेशात किती धन जमा पेले आहे ?, देशात कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत ? या खात्यांमध्ये किती धन आहे ?, देशात आणि परदेशात कुठे आणि किती मालमत्ता आहे, यंग इंडियन्स कंपनीची मालमत्ता किती, ती कोठे कोठे आहे, तिचे व्यवहार कोण आणि कसे पाहते, या कंपनीचे स्वरुप काय आहे, इत्यादी अनेक प्रश्न त्यांना मालमत्तांसंबंधी विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांची उत्तरे गांधी सरळ आणि स्वच्छपणे देऊ शकले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ईडीने राहुल गांधी यांच्याकडे अनेक महत्वाच्या कागदपत्रांचीही मागणी केली असे बोलले जाते.
दुसऱया दिवशीही निदर्शने
राहुल गांधी यांची ईडीकडून छळवणूक केली जात आहे, असा आरोप काँगेस कडून करण्यात येत आहे. दुसऱया दिवशीही गांधींना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याने काँगेसचे नेते व कार्यकर्ते यांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली. सोमवारी निदर्शने करताना पोलिसांनी दिल्लीत काँगेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि पी. चिदंबरम यांच्याशी धक्काबुक्की केली असा आरोप काँगेसने केला.
बरगडय़ा मोडल्याचा आरोप
धक्काबुक्कीत पी. चिदंबरम यांच्या छातीला मार बसला असून त्यांच्या बरगडय़ा मोडल्याचा आरोप काँगेसच्या वतीने करण्यात आला. सुरजेवाला यांनाही गांभीर जखमा झाल्या आहेत, असे प्रतिपादन करण्यात आले. तथापि, हे आरोप अतिरंजित असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.