वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या एस. विद्याराणी देवीने 55 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले.
विद्याराणीने एकूण 198 किलो (84 व 114) वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. नायजेरियाच्या अदिजात ओलारिनोयने एकूण 203 (90 व 113) किलो वजन उचलित सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल चॅम्पियनशिपच्या नियमानुसार विद्याराणीने क्लीन व जर्कमध्ये सर्वाधिक 114 किलो वजन उचलल्यामुळे तिला सुवर्ण देण्यात येणार आहे. विद्याराणी देवीचे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक मात्र अगदी थोडक्यात हुकले. त्यामुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. टय़ुनिशियाच्या घोप्रेन बेलखिरने एकूण 203, युक्रेनच्या ओलारिनोय व स्वितलाना समुलियाक यांनी प्रत्येकी 201 किलो वजन उचलले.
वर्ल्ड चॅम्पियनशिप व राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धा एकाच वेळी येथे घेण्यात येत आहे. राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये एकूण वजनात सुवर्ण मिळविणाऱयांना पुढील वर्षी बर्मिंगहॅममध्ये होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळणार आहे.