ऑनलाईन टीम / बीड :
हैदराबाद-हडपसर रेल्वे गाडीमध्ये उदगीर-लातूर रोड प्रवासादरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. छेडछाड करणारा एनसीबीचा अधिकारी असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
दिनेश अंकुश चव्हाण असे एनसीबी अधिकाऱयाचे नाव आहे. तो एनसीबीत (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) अधीक्षक आहे. गुरुवारी रात्री हैदराबाद-हडपसर रेल्वे गाडीमध्ये उदगीर-लातूर रोड प्रवासादरम्यान चव्हाण याने एका विद्यार्थीशी छेडछाड केली. याप्रकरणी विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चव्हाण याला परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.