वार्ताहर / कोवाड
कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीमान व्ही.पी.देसाई ज्युनियर कॉलेज च्या संतप्त विद्यार्थीनी नी चंदगड आगाराची कोवाड चंदगड बस अडवून चंदगड आगाराला सज्जड ईशारा दिला. ऐन आढवड्या बाजारा दिवशीच दीड तास ठिया आंदोलन छेडलयाने बाजारपेठत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
कोरोना च्या भयावह परिस्थिती नंतर शासनाने 8 वी ते 12 वि सुरू केली आहे. पण चंदगड आगारच्या बसेस अद्यापही व्यवस्थित सुरू झाल्या नाहीत. एकतर आगाराने विद्यार्थी वर्गाला पास दिले आहेत आणी बसेस चालू नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्या नंतर रणरणत्या उन्हात उपाशी पोटी दीड दोन तास चालत घरी जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी अचानकपणे युवतींनी पुढाकार घेऊन कोवाडहुन चंदगड ला जाणाऱ्या बस च्या आडवे बसून भर रस्त्यात ठिय्या आनोंदलन केले. यावेळी दुदंगे गावचे युवा सरपंच राजू पाटील यांनी ही विद्यार्थी वर्गाला पाठिंबा देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलन ला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोना मुळे अगोदर च विद्यार्थी वर्गाचे अपरिमित शैक्षणिक हानी झाली आहे. आता कॉलेज सुरू आणी गाड्या नाहीत ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आपण विद्यार्थी च्या लढ्यात उत्स्फूर्त भाग घेतला असे सांगितले.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना चंदगड आगाराच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून समजताच शुक्रवार पासून गाड्या सुरळीत चालू होतील असे आश्वासन दिल्याने सावित्रीच्या लेकींनी आंदोलन मागे घेऊन बस ला वाट दिली.