पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे पोलीस स्थानकावर दुपारी दहावीच्या आणि बारावीच्या सुमारे 40 विद्यार्थ्यांना गोवा पोलिसांची बस गाडीत आल्यानंतर पेडणे पोलीस स्थानकावर आणल्याने सरकारचा कृतीचा केला राष्ट्रवादी व आमआदमी पक्षाने निषेध.
दहावी व बारावीची परीक्षा कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे ती पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांच्या सांतीनेज पणजी येथील बंगल्यावर मोर्चा काढून सुमारे 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी असलेले विद्यार्थी नेते व विद्यार्थ्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस बसमध्ये कोंबून पेडणे पोलीस स्थानकात आणल्याने विविध स्तरावर सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला.
परीक्षा पुढे ढकला , विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून राजकारण करु नकाः संजय बर्डे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर सरचिटणीस संजय बर्डे यांनी पोलिस स्थानकावर त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत सरकारचा आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विद्यार्थ्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत गोव्यातील प्रवेश द्वार उघडे आहे ते अगोदर बंद करावा, कॅसिनो बंद करावा आणि विद्यार्थी सध्या कोविडग्रस्त सापडले आहेत त्यांच्या भल्यासाठी ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करत या मागणीचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सहानुभूती पूर्वक विचार करुन निर्णय घ्यावा असे आवाहन संजय बर्डे यांनी केले.
यावेळी आम आदमी पक्षाचे गोव्याचे निमंत्रक राहुल म्हाबरे पेडणे पोलीस स्थानकावर येऊन पोलिसांनी पेडण्यात आणलेल्या सुमारे 40 विद्यार्थ्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करत सरकार या लहान विद्यार्थ्यांना आणून काय साध्य करू पाहते? हे विद्यार्थी वेळच्या दहशत खाली असल्याने त्यांना ही परीक्षा पुढे ढकलायची आहे तर सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. विद्यार्थी आणि पालक दहशत खाली असून सरकारने यावर गांभीर्याने विचार करून दहावीची आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलावी,अशी मागणी यावेळी राहुल म्हाबरे यांनी केली.
दहावी व बारावीची परीक्षा कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे ती पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांच्या सांतीनेज पणजी येथे मोर्चा काढून सुमारे 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आंदोलन करत असताना या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस बसमध्ये कोंबून पेडणे पोलीस स्थानकात आणले ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले.
यावेळी राष्टवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस संजय बर्डे तसेच आमआदमी पक्षाचे गोवा निमंञक राहुल म्हांबरे यांनी पेडणे पोलीस स्थानकात येऊन या सरकार व पोलीस यंञणेचा निषेध करत या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी केली.