प्रतिनिधी / आचरा :
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती सावधानता बाळगण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे केले.
रेझिंग डे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर आपले फोटो, मेसेज पाठविताना काळजी घेण्यास सांगितले जेणेकरून आपल्या फोटोचा कोणीही दुरुपयोग करणार नाही. यावेळी पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांना पोलीस हत्यारांबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या सोबत कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य दळवी, स्कूल कमिटी सदस्य विद्यानंद परब, पोलीस कर्मचारी साटम, अक्षय धेंडे, महिला पोलीस काँस्टेबल मलमे, जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दळवी यांनी, तर आभार विद्यानंद परब यांनी मानले.