वार्ताहर/ धामणे
मालवाहू 407 टेम्पो चालकाचे स्टेअरिंगचे रॉड नादुरुस्त झाल्याने वडगाव-धामणे रोडच्या शेजारी असलेल्या विद्युत खांबाला धडक देऊन टेम्पो रस्त्याशेजारील नाल्यात कोसळला. यामध्ये टेम्पोचे बरेच नुकसान झाले आहे.
धामणे कार्यक्षेत्रातील देवगणहट्टी येथील बसवंत बसरीकट्टी यांच्या मालकीचा 407 टेम्पो (क्र. एमएच 04, डीएस 0348) असून सुनील लक्ष्मण पाटील (रा. मासगौंडहट्टी) हे धामणे येथे सिमेंट उतरवून येतेवेळी वडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना बुधवारी घडली. धडक बसल्याने विद्युतखांब मोडून टेम्पोवर पडल्याने बरेच नुकसान झाले आहे. घटना दुपारच्यावेळी घडल्याने अनुचित प्रकार घडला नाही. कारण या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ जास्त असते.