अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत पाण्याची मोटार चोरी प्रकरणी ३ मोटरीसह साहित्य व तिघे आरोपी मुद्देमाला सोबत अटक करण्यात आले.
अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन दाखल गुन्हयामधील अनोळखी फरार आरोपी त्यांचे नाव पत्ता निष्पन्न केले असता स्वामन्ना भिमशा कोळी रा. सातनदुधनी, रोहित देवेंद्र आलमेलकर रा. अफजलपुर, रेवणसिद्ध भिमशा गोल्हार, अफजलपुर यांना सदर गुन्ह्यांमध्ये अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली पाणबुडी मोटर हस्तगत केली आहे. तसेच सदर आरोपींकडे आणखी तपास केला असता त्यांच्याकडून अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल (एकुण 3 पाण्याचे मोटार, 3 स्टार्टर, 40 फुट केबल) असे हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच सदर अटकेतील आरोपीकडून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने कसून तपास चालु आहे.सदरची कामगिरी पोनि प्रदीप काळे यांचे मार्गदर्शनाखाली पो. स. इ. बाडीवाले, छबु बेरड, ASI लोकरे, पोह अजय भोसले,पो ना नबी मियावाले, सुभाष दासरे,अल्ताफ शेख,पो कॉ अजय शिंदे,महादेव शिंदे यांनी केली आहे