हेस्कॉम कर्मचाऱयांचा विरोध : कार्यालयासमोर आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने देशातील सर्व विद्युत विभागांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वेगाने हालचाली सुरू असल्याने याला कर्मचाऱयांचा विरोध होत आहे. या खासगीकरणा†िवरोधात बुधवारी रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात कर्मचाऱयांनी आंदोलन केले. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कर्मचाऱयांनी सरकारला दिला.
खासगीकरणाविरोधात देशभर विद्युत कर्मचारी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱयांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून खासगीकरण झाल्यास त्याचा फटका शेतकऱयांनाही बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. खासगीकरणाच्या विरोधाबरोबरच जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कामगारांना नोकरीत सामावून घेणे, ज्या जागा रिक्त आहेत त्या भरून घेणे, कर्मचाऱयांना किमान वेतन देणे, अशा विविध मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत.
400 हून अधिक लाईनमन सहभागी
हेस्कॉम कर्मचाऱयांनी बुधवारी एकत्रित येवून आंदोलन केले. यामध्ये 400 हून अधिक लाईनमन तसेच अधिकारी सहभागी झाले होते. केपीटीसीएल कर्मचारी युनियन, डिप्लोमा इंजिनिअरिंग असोसिएशन, एससी-एसटी कर्मचारी संघ यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व पी. एन. बेळीकट्टी यांनी केले.