नूतन नगरसेवकांनाही मतदानाचा हक्क
प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी 10 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 8 हजार 875 मतदार आहेत. याबाबत अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून या निवडणुकीसाठी महापालिकेवर निवडून आलेले नगरसेवकदेखील पात्र ठरले आहेत. त्यामुळे मतदारांचा आकडा वाढला आहे. जिल्हय़ातील एकूण 15 नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य मतदान करणार आहेत. त्याचबरोबर 14 तालुक्मयातील 496 ग्राम पंचायतींचे सदस्यदेखील मतदान करणार आहेत.
जिल्हय़ामध्ये दोन विधान परिषद सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. भाजप, काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण किती मतदार? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याचबरोबर नूतन नगरसेवकांनाही मतदानाचा हक्क मिळणार की नाही? हे देखील स्पष्ट नव्हते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांनाही मतदान करण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
जिल्हय़ातील 18 नगरपालिका व नगरपंचायतीवर सध्या प्रशासक आहेत. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामधील सदस्य मात्र या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. जिल्हय़ात एकूण 33 नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील 15 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार आहे. एकूण या निवडणुकीसाठी आता मोठी चुरस वाढली असून भाजप आणि काँग्रेस हे दोघेही आपली ताकद पणाला लावणार आहेत.
मतदारयादी कधी प्रसिद्ध होणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागून होते. अंतिम यादी आता प्रसिद्ध झाल्याने मतदार किती आहेत? हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील उमेदवार त्या दृष्टीने प्रचार करण्याची शक्मयता आहे. अद्याप या निवडणुकीसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मात्र, मंगळवारी भाजपसह इतर सर्वच पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्मयता आहे. आता निवडणुकीचा प्रचार जोर धरणार असून साऱयांचेच लक्ष त्याकडे लागले आहे.
10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सर्वती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातच कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. एकूणच आता या निवडणुकीची रंगत वाढणार आहे.