प्रतिनिधी /पणजी
येत्या दि. 18 व 19 ऑक्टोबर रोजी होणाऱया दोन दिवशीय राज्य विधानसभा अधिवेशनासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आणि कार्यक्रम निश्चितीसाठी आज मंगळवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार मंडळाची बैठक विधानसभा प्रकल्पात सभापती राजेश पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
या बैठकीत दोन दिवशीय अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित होईल. या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधिमंडळ कामकाज मंत्री नीलेश काब्राल, विरोधी नेते दिगंबर कामत, मगो नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई उपस्थित राहतील.