बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेसमध्ये २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून पक्षात गोंधळ सुरु आहे. या गोंधळावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री थिमप्पा म्हणाले की, कर्नाटकच्या २०२३ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून कॉंग्रेस नेत्यांनी केलेली चर्चा पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी सागर येथे तालुका प्रशासनाच्या अपयशाविरोधात झालेल्या आंदोलनावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
माजी मंत्री थिमप्पा म्हणाले, “कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोकांचे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि पुढील विधानसभा निवडणुकाहोईपर्यंत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे म्हणाले.