प्रतिनिधी / खेड
विधानसभेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्यपदी दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी तसे नियुक्ती पत्र दिले आहे.
विधानसभा सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्यपद महत्त्वपूर्ण मानले जाते. या निवडीबद्दल तत्कालीन पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि प सदस्य अरूण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, नागेश तोडकरी, बिपीन पाटणे, नेहा वैद्य, उषा गुहागरकर, रईसा मुजावर, युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, राकेश सागवेकर दर्शन महाजन, शहरप्रमुख निकेतन पाटणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.