विविध समितीवर रामराजे, बाळासाहेब पाटील आणि मकरंद आबा यांची वर्णी
प्रतिनिधी/ सातारा
महाविकास आघाडी सरकारने विधान सभा अध्यक्षांच्या संमतीने 2020-21या वर्षासाठी विधान मंडळांच्या विविध समिती सदस्यांची निवड करण्यात आली.सातारा जिह्यातील विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मकरंद आबा यांची वेगवेगळ्या समितीवर निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जणांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमुळे सातारा जिह्यात राष्ट्रवादी पुन्हा एकदा भक्कम अशी वाटचाल सुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे हे जिह्यासाठी बेरजेचे गणित आहे.रामराजे यांच्यामुळे जिह्यातील ग्रंथालयाना बळ मिळणार आहे.तसेच जिह्यातील अल्पसंख्याक समाजाला ही भरघोस निधी आमदार मकरंद आबा यांच्याकडून मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या विधान मंडळांच्या समित्या विधान सभा अध्यक्ष यांच्या संमतीने निवडण्यात आल्या.त्यात ग्रंथालय समितीच्या प्रमुख म्हणून रामराजे नाईक-निंबाळकर, अल्पसंख्याक कल्याण समिती व अंदाज समितीवर आमदार मकरंद आबा तर विधी मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतन संयुक्त समितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.या बालेकिल्याने आज पर्यंत 1999 पासून अभेद असा राहिला आहे.किती लाटा आल्या किती वादळ आली पण बालेकिल्ला तसाच राहिला आहे.2019च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या शेवटच्या सभेने पुन्हा राज्यात सत्ता खेचून आणली.त्यामुळेच सातारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एक सुत्र तयार झाले आहे.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सातारा जिह्यात राष्ट्रवादीला झुकते माप आहे.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्याकडे ग्रंथालय समितीचे प्रमुख पद दिले गेले आहे.रामराजेंना वाचनाचा मोठा नाद असल्याने जिह्यातील ग्रंथालयाना आता भरीव निधी मिळणार आहे.तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची ही निवड महत्वाच्या समितीवर झाली आहे.तसेच मकरंद आबा यांची निवड दोन समितीवर झाली आहे.अंदाज समिती आणि अल्पसंख्याक समिती या दोन्ही समितीचे सदस्य झाल्याने जिह्यासाठी एक मोठी जबाबदारीच आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडीत सातायाला झुकते माप दिले आहे.