प्रतिनिधी /ओरोस-
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मालवण दांडी येथील विनय नारायण जाधव २५ याला दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने ३५४ डी आणि पॉस्को ८ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्ष तर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.