प्रतिनिधी / बेंगळूर
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य आणि भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी
यांची जामीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. योगीश गौडा हत्येप्रकरणी विनय कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली होती. ते सध्या हिंडलगा कारागृहात आहेत. जामीन मिळविण्यासाठी त्यांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवरील सुनावणीवेळी सीबीआयच्या वकिलांनी युक्तीवाद करताना विनय कुलकर्णींविरुद्ध न्यायालयात चार्जशिट दाखल करण्यात आला आहे. ते प्रभावी व्यक्ती असल्याने जामीन दिल्यास पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती केली.