प्रतिनिधी /बेळगाव
विनय युथ फौंडेशनच्या माध्यमातून मागील 26 दिवसांपासून दररोज 400 हून अधिक व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. शहर व उपनगरांमधील गरजू व्यक्तींना तसेच पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱयांना अन्न पदार्थांचे वाटप करण्यात आले. मागील 26 दिवसात 10 हजारांहून अधिक फुड पॅकेट वितरित करण्यात आले.
विनय युथ फौंडेशनचे अध्यक्ष विनय भातकांडे, प्रतिभा भातकांडे, श्रेया भातकांडे, चिराग भातकांडे, सर्वेश यल्लारीचे, प्रशांत सावंत, आदित्य लोखंडे, महादेव नेगीनार, रोहित आग्रे, अमित बांबूचे, तनुजा पाटील, जितू पाटील, मयूरी नाईक, सचिन भातकांडे, शिवराज भातकांडे, रोहन राजबाचे, नागेश पाटील, विराज जाधव, सतीश नाईक, ओम जाधव, शिवकुमार, साक्षी कवठेकर, अनुष्का राजपूत, अमृता सेठ, पार्वती पवार यांच्यासह कार्यकर्ते यांनी या साहित्याचे वाटप केले.