प्रतिनिधी/ बेळगाव
1987 ते 1995 मधील खासगी विनाअनुदानीत कॉलेजना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या उपसमितीने दिलेल्या शिफारशीनुसार राज्यातील 93 महाविद्यालये या अंतर्गत येतात. या महाविद्यालयांना अनुदान मंजूर करावे अशी मागणी कर्नाटक राज्य विना अनुदानित महा विद्यालय कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली.
93 कॉलेजमध्ये 2256 प्राध्यापक आहेत. त्यांच्या वेतनासाठी 147.5 कोटी रूपये अनुदान द्यावे लागणार आहे. 93 पैकी 56 कॉलेज हे उत्तर कर्नाटकात तर 20 कॉलेज हैदराबाद-कर्नाटक विभागात आहेत. शैक्षणिक सुधारणा करण्याची क्षमता खासगी महाविद्यालयांमध्ये असल्याने राज्य सरकारने या महाविद्यालयांना अनुदान द्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अध्यक्ष शिवानंद दगरगी, योगानंद एस. वाय. यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.