प्रतिनिधी /बेळगाव
विनाअनुदानित शाळा-महाविद्यालय संघटनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून बेंगळुरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी आंदोलकांची भेट घेऊन 1995 नंतर सुरू झालेल्या शाळांना अनुदान देण्याची ग्वाही दिली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून केवळ आश्वासनच दिले जात असल्याने यावेळी अध्यादेश मिळेपर्यंत धरणे आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
आंदोलनात राज्य संघटना अध्यक्ष जे. सी. शिवाप्पा, बेळगाव जिल्हा सचिव मारुती आजाणी, सदस्य प्रा. सुरेश कांबळे, प्रा. मारुती सुतार, के. पी. शिनोळकर, रमेश कुरंगी, पी. के. चव्हाण, सूरज पिसाळे, विनायक चौगुले, मारुती कंग्राळकर, मोहन कदम, विठ्ठल खन्नुकर यांनी सहभाग घेतला आहे.