सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरासह तालुक्याला कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनातील चार प्रमुख अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सावंतवाडी शहर बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांना पकडत त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. जवळपास ३० हून अधिक जणांवर कारवाई केली गेली. तसेच बाजारपेठेतील काही दुकाने सुरू असल्याचे आढळतात त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. तब्बल एक तासाहून अधिक काळ ही मोहीम राबवण्यात आली. त्यात प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, पोलीस निरीक्षक फूलचन्द्र मेंगडे या अधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली.