प्रतिनिधी /सातारा :
सातारा जिह्यात कोरोनाचा वाढत चाललेला प्रसार पाहून सातारा पंचायत समितीने ही आता विनाकारण येणायांना लगाम घालण्यासाठी गेट बंद ठेवले आहे.पदाधिकायांनी मायक्रो कंटेंटमेंट झोनमधून येणाया गटविकास अधिकारी यांनाही न येण्याची विनंती केली आहे.प्रत्येक जणांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे.दोन दिवस पंचायत समितीचे कामकाज बंद ठेवण्याखलबते झाल्याचे समजते.
सातारा पंचायत समितीच्या कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता.कोणीही सोशल डिस्टनन्स पाळत नव्हते.त्याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच पंचायत समितीच्या पदाधिकायांनी चर्चा करून निर्णय घेतला. कोरोनामुळे परिस्थिती बिकट होण्याआधीच काळजी घेण्यात आली तर बरे.म्हणून सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, माजी सभापती मिलिंद कदम, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, आशुतोष चव्हाण यांनी कडक नियम करण्याचे सूचित केले.पंचायत समितीचे गेटच बंद ठेवून पंचायत समितीत यायचे असेन तर काय काम आहे, हे बाहेरच विचारणा करून त्याचे थर्मल स्कॅनिंग करून प्रवेश दिला जात आहे.दरम्यान, पदाधिकारी यांनी जे कर्मचारी कंटेंटमेंट झोनमधून येतात त्यांना घरीच थांबा विशेष करून गटविकास अधिकारी यांनाच विनंती केली आहे.तसेच सर्व इमारत सॅनिटायझर करण्यासाठी दोन दिवस कामकाज बंद ठेवण्यासाठी खलबते झाल्याचे समजते.