प्रतिनिधी /सातारा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना तसेच कोणतेही वाहन घेवून रस्त्यावर फिरु नका असा आदेश असताना या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील पोवईनाक्यावर मयुर अशोक उत्तेकर (रा. उत्तेकरनगर, सदरबझार, सातारा), सुधाकर गणपती बोबडे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) तसेच कुमार मडीवलप्पा वग्गर (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) हे कोणत्याही सबळ कारणाशिवाय दुचाकीवरुन फिरत होते. जिल्हाधिकाऱयांनी ठरवून दिलेल्या वेळेचे तसेच संचारबदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱयांनी त्यांच्यावर कारवाई केली. याबाबत पोलीस शिपाई सुनील कर्णे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार के. एम. घाडगे करत आहेत.