कणकवलीत डीवायएसपी, न. पं. ची कारवाई : आठवडा बाजार रद्द असूनही बजारपेठेत गर्दी
वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊनमध्ये जिल्हय़ात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली, तरी संचारबंदी कायम आहे. मंगळवारी आठवडा बाजार बंद असूनही बाजारपेठेत मंगळवारी सकाळपासूनच झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी बाजारपेठेत फिरून विनापरवाना बसलेले भाजी व रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना न. पं. कर्मचाऱयांमार्फत हटविले. बाजारपेठेत एकदिशा मार्गाची अंमलबजावणीही करण्यात येत असूनही आज शहरात नेहमीपेक्षा वर्दळ वाढल्याने याचा ताण पोलीस यंत्रणेवर आल्याचे चित्र होते.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मंगळवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही सकाळपासूनच शहरात नागरिकांची गर्दी कमी होण्याची चिन्हे नाहीत. शहरात पोलिसांचे लावण्यात आलेले पॉईंट चुकवून नागरिक शहरात येत असल्याची बाब समोर येत आहे. गर्दी होऊ लागल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी बाजारपेठेतून फिरत भाजी व रस्त्यावर बसलेल्या अन्य विक्रेत्यांना हटविण्याबाबत न. पं. कर्मचाऱयांना सूचना दिल्या.
गर्दी पांगविण्यासाठी कार्यवाही
सकाळी 7 पासूनच न. पं.चे कर्मचारी प्रवीण गायकवाड, भाई साटम, रवी म्हाडेश्वर, सतीश कांबळे, प्रशांत राणे यांच्या पथकाने डॉ. कटेकर यांच्यासोबत फिरून भाजी व रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना हटविले. न. पं.मार्फत शहरात 17 ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी जागा ठरवून देण्यात आल्या आहेत. तेथेच त्यांनी विक्री करायची आहे. अन्य ठिकाणी दुकाने लावल्यास माल जप्तीसोबतच दिलेला परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
डीवायएसपींची बाजारपेठेत गस्त
वारंवार सूचना देऊनही गर्दी कमी होत नसल्याने डॉ. कटेकर यांनी सकाळच्या सत्रात तीनवेळा बाजारपेठेत गस्त घालत गर्दी पांगविण्याच्यादृष्टीने कार्यवाही केली. मात्र, दुपारपर्यंत बाजारपेठेत नेहमीपेक्षा वर्दळ होती. पटकीदेवी ते झेंडा चौकापर्यंत वन वेची अंमलबजावणी करण्यात येत होती. दुपारपर्यंत पटवर्धन चौकातून बाजारपेठेत वाहने जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला होता. पोलिसांकडून याची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येत होती.
मच्छीमार्केट मंगळवारी बंद
रविवारी कणकवली मच्छीमार्केटमध्ये मोठी गर्दी झाल्याने आठवडा बाजारासाठी गर्दी होण्याच्या शक्यतेने मच्छीमार्केट बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत मटण, चिकन, मच्छी विक्री करण्यास परवानगी असली, तरी मच्छीमार्केटमध्ये होणाऱया गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काहींनी पर्यायी जागा शोधल्या. मात्र, मार्केटमध्ये मच्छी विक्रेत्यांनी मच्छी स्टॉक करून ठेवल्याने त्या मच्छीची नासाडी होण्याची भीती या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत होती. $u {$A]={$u {$�]={$u {$9^={$u {$�^={$u {$1_={$u {$�_={$u {$)`={$u {$�`={$u {$!a={$u {$� {({4��