प्रतिनिधी /म्हार्दोळ
प्राण्यांची आवड असलेला व त्याना मदत करण्यासाठी तात्पर राहणारा आकार म्हार्दोळ येथील विनायक आकारकर यांनी म्हार्दोळ येथे ओव्हाळात पेडलेल्या एका कुत्राचा प्राण वाचविला.
या कुत्राला वाहनाचा धक्का बसल्याने त्याचे कंबर मोडल्याने त्याला चालता येत नव्हते. ओव्हाळाच्या पाण्यात पडलेला पाहून विनायक यांनी पंचायतीमध्ये संपर्क साधून मदत मागीतली पण पंचायतीमध्ये असलेल्या पाणी विभागच्या माणसे आली आणि त्या कुत्राला पाण्याबाहेर न काढता निघून गेली. मात्र कुत्राचा प्राण वाचविण्यासाठी विनायक यांनी जिवाची परवा न करता पाण्यात उतरुन त्याला पाण्या बाहेर काढले.
पंचसदस्य रणजीत प्रभूदेसाई यांना या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेतली पण प्राणी विभागाच्या माणसाची काहीच मदत न झाल्याने येथे असलेल्या नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली.