खाद्यप्रेमींसाठी एकाच छताखाली विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ होणार उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
खास बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी हिंडलगा रोडवरील विनायक नगर येथे गणपती मंदिराच्या समोर, गणाधीश लॉनच्या परिसरात आकर्षक सजावटीने फूड स्ट्रीटचा दिमाखदार प्रारंभ नववर्षदिनी होत आहे, बेळगावची हवा, बेळगावचं पाणी व खाद्यप्रेमी बेळगावकर हे अस खास समीकरण आहे. बेळगावकर नवनवीन खाद्यपदार्थांना भरभरून प्रतिसाद देतात.
बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी एकाच छताखाली विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ फूड स्ट्रीट येथे मिळतील. भारतातील सुप्रसिद्ध व वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थ फूड स्ट्रीट येथे मिळतील, दिल्लीतील सुप्रसिद्ध चांदणी चौकमध्ये मिळणारे विविध चाट पदार्थ, पॅटिस व कचोरी दिल्ली चाट हाऊसमध्ये असतील, मालगुडी एक्स्प्रेसमध्ये सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय पदार्थांची रेलचेल असेल, चाय टपरीमध्ये चहा प्रेमींसाठी विविध प्रकारचे चहा व कॉफी उपलब्ध असतील, ड्रगन व्हीलमध्ये भरपूर नानाविध चायनीज पदार्थ उपलब्ध असून बॉम्बे स्ट्रीट मध्ये मुंबईच्या खास पदार्थांची सोय असणार आहे. फूड स्ट्रीटची आकर्षक सजावट हे एक खास आकर्षण असून फूड स्ट्रीट नाविन्यपूर्ण दर्जेदार व लज्जतदार पदार्थ देण्यास सज्ज झाली आहे. दिनांक 1 जानेवारीला शुभारंभप्रसंगी सर्व ग्राहकांना खास आकर्षक अशा विविध ऑफर्स मिळणार असून फूड स्ट्रीटच्या प्रांगणात ठेवलेल्या लकी कुपन बॉक्समधून त्या उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी. कोविड सूचनांचे पालन करण्यात येत असून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 8.30 पर्यंत फूड स्ट्रीट चालू राहील.