बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच बीएमटीसीने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे. दरम्यान बीएमटीसी ने १७,७९९ फेऱ्यांची तपासणी केली, यावेळी १,७०४ तिकीट नसलेल्या प्रवाशांना दंड केला. या विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून बीएमटीसीने २,६७,९५० रुपये दंड वसूल केला आहे. तसेच जुलै २०२१ मध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल चालकांवर १,१८८ गुन्हे दाखल केले.
या व्यतिरिक्त, बीएमटीसी तपासणी कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसल्या प्रकरणी चार पुरुष प्रवाशांना दंड केला आणि त्यांना ४०० रुपये दंड ठोठावला.