प्रतिनिधी/ सातारा
बाँबे रेस्टारंट चौक, वनवासवाडी चौक परिसरात विना परवाना वाढदिवस शुभेच्छांचे फ्लेक्स लावल्याप्रकरणी संतोषभाऊ जाधव (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी बाँबे रेस्टारंट चौक तसेच सातारा-कोरेगाव रस्त्यावरील वनवासवाडी चौक येथे संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फ्लेस लावण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होईल असे मोठय़ा आकारांचे फ्लेक्स कोणतीही परवानगी न घेता लावून विद्रुपीकरण केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील कर्णे यांनी तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.