गुरूवारी दिवसभरात 39 हजार रूपये दंड वसूल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बाधितांचा अकडा देखील वाढत चालला आहे. अशा स्थितीतही नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसह बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्याची माहिम महापालिकेच्या वतीने करण्यात आली. गुरूवारी दिवसभरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईवेळी 39 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, तेंडाला मास्क लावणे, तसेच विविध नियमावली घालून देण्यात आली आहे. बाजारपेठेत फिरताना किंवा गर्दीच्या ठिकाणी तेंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश नागरिक नियमावलीकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या कोरोना विषाणुचा प्रसार वाढत असल्याने बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी देखील नागरिक तोंडाला मास्क वापरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने पुन्हा हाती घेतली आहे. शहरातील विविध भागात ही मोहिम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकी व चार चाकी वाहन चालक तसेच बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करून गुरूवारी दिवसभरात 34 हजार 500 रूपये दंड वसुल करण्यात आला. सदर कारवाई महापालिकेच्या पर्यावरण सहाय्यक अभियंत्यांसह स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. ही कारवाई सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.