नवी दिल्ली
हवाई वाहतूक क्षेत्रात नाव कमावलेल्या विस्तारा कंपनीच्या सीईओपदी विनोद कन्नन यांची निवड करण्यात आली आहे. विनोद कन्नन यांनी 2019 मध्ये विस्तारामध्ये चिफ स्ट्रटेजी ऑफिसर म्हणून सेवेला प्रारंभ केला होता. चिफ कमर्शियल ऑफिसर असणारे विनोद कन्नन आता कंपनीच्या सीईओ पदाची धुरा सांभाळणार असून 1 जानेवारी 2022 पासून आपली जबाबदारी खांद्यावर घेणार आहेत.
याआधीचे सीईओ लेस्ली थींग हे सिंगापूर एअरलाइन्समध्ये रुजू होणार आहेत.