14 जुलै रोजी पणजीत मुख्यमंत्र्यांहस्ते प्रदान होणार
प्रतिनिधी /वाळपई
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कौशल्यचार्य पुरस्कार होंडा सत्तरी याठिकाणी आयटीआयचे अध्यापक विनोद सतकळकर याना जाहीर करण्यात आलेला आहे. बुधवार दिनांक 14 जुलै रोजी सदर पुरस्कार त्यांना पणजी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका खास समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की दरवषी गोवा सरकारतर्फे औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये अभिनंदनीय कार्य करणाऱया अध्यापकांसाठी कौशल्यचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो . यंदाचा च हा मान विनोद सतकळकर याना प्राप्त झाला आहे .
यासंदर्भाचे निवड पत्र त्यांना आज ात्याचे वरि÷ अधिकाऱयाकडून प्राप्त झालेले आहे. हा प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 14 जुलै रोजी पणजीत प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर प्रशिक्षण संस्थेमध्ये दरवषी निकाल, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, वेगवेगळे कौशल्य राबवून त्यांना समर्पक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, मुलांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे, यावर या पुरस्काराची निवड करण्यात येत असते. यात विनोद सतकळकर हे सक्षम ठरल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान यासंदर्भात विनोद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भाचा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत अधिक बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात आपण गोवा राज्यातील काणकोण फर्मागुडी याठिकाणी अध्यापनाचे कार्य करून सध्या होंडा याठिकाणी अध्यापनाचे कार्य करीत आहे. या दहा वर्षाच्या कारकिर्दीत फिटर या क्षेत्रांमध्ये मुलांना चांगल्या प्रकारचे कौशल्य विकसित करण्यावर आपण प्रामाणिकपणे भर दिलेला आहे. यासाठी प्रत्येक प्राचार्य सहकारी अध्यापक, पालक व मुलांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेले आहे. आपण केलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती आपल्याला मिळाली यामुळे आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.