बेंगळूर
जागतिक स्तरावरची सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रणी कंपनी विप्रोने ब्राझीलमधील आयटी फर्म आयव्हीआयए सर्व्हिकोस डी इन्फॉर्मेटीका लिमिटेडची खरेदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आयटी कन्सल्टींग व सर्व्हिस फर्मची खरेदी 168 कोटी रुपयांना विप्रोने केली असल्याचे समजते. आयटी क्षेत्रात विकसित पद्धती, देखभाल, सल्ला तसेच प्रकल्प व्यवस्थापन सेवासारख्या सेवा ही फर्म देते. वित्तसेवा, रिटेल, वाहतूक, हेल्थ केअर तसेच कंझूमर गुड्सच्या क्षेत्रात या फर्मचे ग्राहक आहेत. ही फर्म गेली 24 वर्षे कार्यरत आहे. दरम्यान विप्रोचा यंदाच्या पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा 2390 कोटी रुपयांचा राहिला आहे. जो मागच्या वर्षाच्या तिमाहीपेक्षा 0.1 टक्के अधिक आहे. मागच्या वषी याच कालावधीत 2387.4 कोटी रुपयांचा नफा विप्रोला झाला होता.