बेंगळूर
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोने डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 14 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे समजते. कंपनी सध्या नव्या तंत्रज्ञानासाठी युरोप, अमेरिका आणि आशियाई प्रशांत देशांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समजते. डिसेंबर 2020 अखेर बेंगळूरमध्ये कार्यालय असणाऱया आयटी कंपनी विप्रोने 2900 प्रेशर्ससह 14000 जणांना कंपनीत सामावून घेतले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाकरता कंपनी गुंतवणूक करणार असून यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ कंपनीने घेतले आहे.